1 Kings 21:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला. त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्याला सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तिला म्हणाला, “इज्रेलकर नाबोथ ह्याला मी म्हणालो की, ‘पैसे घेऊन मला तुझा द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षमळा देतो’; ह्यावर तो म्हणाला, ‘मी आपला द्राक्षमळा तुला देणार नाही.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो तिला म्हणाला, “कारण येज्रीली नाबोथला मी म्हणालो, ‘तुझा द्राक्षमळा मला विकत दे; नाहीतर तुझी इच्छा असली तर, त्याबदल्यात त्याच किमतीत मी तुला दुसर्या ठिकाणी द्राक्षमळा देईन.’ परंतु तो म्हणाला, ‘मी तुला माझा द्राक्षमळा देणार नाही.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या नाबोथाला मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला ‘त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्यास सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.”