1 Kings 22:43 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपल्या वडीलांप्रमाणेच होता. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्या ठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची सगळी चालचलणूक त्याचा पिता आसा ह्याच्याप्रमाणे होती; ती त्याने सोडली नाही; परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; तथापि त्याने उच्च स्थाने काढून टाकली नाहीत; लोक अजून त्या उच्च स्थानांवर यज्ञ करीत व धूप जाळीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नव्हती आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपले वडिल आसा ह्यांच्याप्रमाणेच वागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटाने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्याठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.