1 Kings 5:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अदोनीराम नावाच्या माणसाला त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. शलमोनाने या लोकांचे तीन गट केले. प्रत्येक गटात 10,000 माणसे होती. प्रत्येक गट लबानोनमध्ये एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लबानोन पर्वतावर दरमहा पाळीपाळीने दहा-दहा हजार बिगारी त्याने पाठवले; एक महिना ते लबानोन पर्वतावर राहत व दोन महिने घरी राहत; अदोनीराम हा बिगार्‍यांवर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्‍यांवर अधिकारी होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अदोनीराम नावाच्या मनुष्यास त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. प्रत्येक गटात दहा हजार माणसे होती. प्रत्येक गट लबानोनात एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत.