1 Kings 5:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझे नोकर ती लबानोनपासून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करुन तुला हव्या त्या ठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तू ती झाडे घे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे चाकर ती लाकडे लबानोनाहून समुद्रापर्यंत नेतील; तेथे त्याचे तराफे करून जे ठिकाण आपण मला नेमून द्याल तेथे जलमार्गाने ती मी पोचती करीन; तेथे ती मी सोडवून ठेवीन; मग तेथून ती आपण घेऊन जा; माझ्या घरच्या सेवकांना अन्नसामग्री पुरवली म्हणजे पुरे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझी माणसे ती लबानोनपासून भूमध्य समुद्रापर्यंत ओढून नेतील, मी त्यांचे ताफे बनवून जे ठिकाण आपण मला सांगाल तिथपर्यंत पोचते करेन. तिथे मी ते वेगळे करेन आणि मग आपण ते घेऊन जाऊ शकता. आणि माझ्या राजकीय घराण्याला आपण अन्न पुरवावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे नोकर ती लबानोनातून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करून तुला हव्या त्याठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तेथून तू घे. माझ्या सेवकांना अन्नपुरवठा तू दिला तो माझ्या ईच्छेनुसार पुरेसा असेल.”