1 Kings 6:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मंदिराच्या आत मागच्या बाजूला तीस फूट लांबीचा अत्यंतपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मंदिराच्या मागल्या भागी जमिनीपासून कडीपाटापर्यंत वीस हात गंधसरूच्या तक्त्यांची मढवणी केली; ह्या प्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी मंदिराला एक गाभारा तयार केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिरामध्येच पवित्रस्थान व परमपवित्रस्थान असावे म्हणून मंदिराच्या मागील बाजूला जमिनीपासून छप्परापर्यंत देवदारूच्या फळ्या लावून त्याने तो वेगळा केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिराच्या आत मागच्या बाजूला वीस हात लांबीचा परमपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या.