1 Kings 7:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडील सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट होते पण ते मरण पावले होते. हिराम हा एक अनुभवी आणि कसबी तांबट होता. म्हणून राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्वीकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने तितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो नफताली वंशातील एका विधवेचा पुत्र होता; त्याचा बाप सोरातला एक तांबट होता. पितळेचे सगळे काम करण्यास लागणारे शहाणपण, अक्कल व कौशल्य हे त्याच्या ठायी भरपूर होते; तो शलमोन राजाकडे येऊन त्याचे सर्व काम करू लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याची आई नफताली गोत्रातील एक विधवा होती आणि त्याचा पिता सोरचा होता, तो कास्याचे काम करण्यात निपुण कारागीर होता. हुराम सर्वप्रकारचे कास्याचे काम करण्यास ज्ञानाने, शहाणपणाने व विद्येने भरलेला होता. तो शलोमोन राजाकडे आला व त्याला नेमून दिलेली सर्व कामे केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडिल सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट कारागीर होते. हिराम हा एक ज्ञानाने, बुद्धीने, आणि कसबी तांबट होता. म्हणून शलमोन राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्विकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने पितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या.