1 Kings 7:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. प्रत्येक स्तंभ सत्तावीस फूट उंचीचा आणि अठरा फूट परिघाचा होता. हे स्तंभ पोकळ असून पत्र्याची जाडी तीन इंच होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने पितळेचे अठरा-अठरा हात उंच असे दोन खांब तयार केले; त्या प्रत्येकाला वेढायला बारा हात दोरी लागे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने कास्याचे दोन खांब तयार केले, प्रत्येक खांबाची उंची अठरा हात आणि घेर बारा हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. ते स्तंभ अठरा हात उंचीचे होते. त्या प्रत्येकाला वेढावयास बारा हात दोरी लागे.