1 Kings 7:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लबानोनचे वनातील घरही त्याने बांधले. ते 150 फूट लांब, 95 फूट रुंद आणि 45 फूट उंच होते. देवदाराच्या स्तंभांच्या त्याला चार रांगा असून प्रत्येक स्तंभावर नक्षीदार घुमटी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने लबानोनगृह नावाची इमारत बांधली होती; तिची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती; ती इमारत गंधसरू लाकडाच्या खांबांच्या चार रांगांवर उभी होती; त्या खांबांवर गंधसरूच्या तुळया ठेवल्या होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने लबानोनच्या वनात जो राजवाडा बांधला त्याची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती, त्याला गंधसरूच्या खांबांच्या चार रांगा होत्या व त्याला आधार देण्यासाठी गंधसरूच्या छाटलेल्या तुळया होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने लबानोनगृह वनातील घरही बांधले. त्याची लांबी शंभर हात, रूंदी पन्नास हात व उंची तीस हात होती. ती ईमारत गंधसरुच्या स्तंभाच्या चार रांगावर असून प्रत्येक स्तंभावर गंधसरूच्या तुळ्या ठेवल्या होत्या.