1 Kings 7:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्या खाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करुन घेतल्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतराने दहा-दहा इंद्रावणे कोरली होती, ती त्या सगळ्या गंगाळसागरासभोवती होती, हा गंगाळसागर ओतला तेव्हाच इंद्रावणांच्या ह्या दोन रांगा त्याच्या अंगच्याच ठेवल्या होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर दहा काकड्या होत्या. या काकड्या हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्याखाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करून घेतल्या होत्या.