1 Kings 7:38 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हिरामने अशीच दहा गंगाळी केली. ती या दहा पालख्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळ सहाफुटी होते. त्यात दोनशेतीस गलन पाणी मावू शकत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी त्याने पितळेची दहा गंगाळे केली होती; एकेका गंगाळात चाळीस-चाळीस बथ पाणी राहत असे; त्या प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होता; त्या दहा चौरंगांतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर त्याने कास्याची दहा गंगाळे बनविली, प्रत्येकात चाळीस बथ पाणी मावत असे आणि त्याचा व्यास चार हात होता, त्या दहा तिवडीतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिरामने अशीच दहा गंगाळे केली. ती या दहा चौरंगासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होतो. त्यामध्ये चाळीस बथ पाणी मावू शकत असे.