1 Kings 7:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या राजाची मुलगी म्हणजे शलमोनची बायको हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवाणखान्याच्या आतल्या बाजूच्या चौकात त्याचे राहायचे घर होते; तेही वरच्यासारखेच बनवले होते. शलमोनाने फारोच्या कन्येशी लग्न केले होते; तिच्यासाठी ह्या दिवाणखान्यासारखेच घर बांधले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ज्या राजवाड्यात तो राहणार त्याची रचना याच खोलीप्रमाणे होती. फारोहच्या ज्या कन्येशी त्याने विवाह केला होता तिच्यासाठी सुद्धा शलोमोनने याच खोलीसारखा राजवाडा बनविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या फारो राजाची कन्या म्हणजे शलमोनची पत्नी हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.