1 Kings 8:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या वडीलांना दिलेली इतर वचनेही. हे, इस्राएलच्या परमेश्वर देवा, तू खरी करुन दाखव तू म्हणाला होतास, ‘दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझे काटेकोर आज्ञापालने केले पाहिजे. तसे झाले तर तुमच्याच घराण्यातील कोणीतरी एकजण नेहमी इस्राएल लोकांवर राज्य करील.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तुझा सेवक, माझा बाप दावीद ह्याला तू असे वचन दिले होते की तू माझ्यासमोर वागत आलास त्याप्रमाणेच तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची खबरदारी घेतील तर माझ्यासमक्ष इस्राएलाच्या राजासनावर बसणार्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटायची नाही; त्याला दिलेले हे वचनही तू पुरे कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीद यांना आपण जे वचन दिले होते ते आपण पाळावे, आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर विश्वासूपणे चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही खुंटणार नाही.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या वडिलांना दिलेली इतर वचनेही हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तू खरी करून दाखव तू म्हणाला होतास, दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझा मार्ग अनुसरला, तर तुमच्या घराण्यातील पुरूषांची परंपरा कधीही खुंटावयाची नाही, एकजण नेहमी इस्राएलाच्या राजासनावर राहील.