1 Kings 8:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पूर्वी तू म्हणाला होतास, ‘येथे माझा सन्मान होईल.’ तेव्हा रात्रांदिवस या मंदिराकडे नजर असू दे. या मंदिरातील माझी ही प्रार्थना ऐक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटलेस त्या ह्या स्थलाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो; जी प्रार्थना तुझा सेवक ह्या स्थानाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘माझे नाव या ठिकाणी राहेल’ असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या नावाचा निवास याठिकाणी होईल, असे ज्या ठिकाणाविषयी तू म्हटले त्या या ठिकाणाकडे रात्रंदिवस या मंदिराकडे तुझी दृष्टी असू दे, जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक.