1 Kings 8:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तरी त्याची प्रार्थना ऐक. आपल्या स्वार्गातील निवासस्थानातूनच ती ऐकून त्यांना क्षमा कर आणि मदत कर. लोकांच्या मनात काय आहे हे तूच फक्त जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर, त्याप्रमाणे घडवून आण, प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनानुसार त्याला फळ दे; कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून ऐकून त्यांना क्षमा करा व त्यानुसार त्यांना करा; प्रत्येकाच्या सर्व कृत्यांनुसार त्यांच्याशी वागा, कारण आपणास त्यांच्या हृदयाची पारख आहे (कारण केवळ आपणच प्रत्येक मानवाचे हृदय जाणणारे आहात),
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर त्यांची प्रार्थना स्वर्गातून ऐकून त्यांना क्षमा कर आणि कृती कर. लोकांच्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.