1 Kings 8:59 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यात खंड पडू देऊ नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या शब्दांनी मी परमेश्वरापुढे विनंती केली आहे ते आपला देव परमेश्वर ह्याच्याजवळ रात्रंदिवस राहोत आणि प्रतिदिनी जरूर पडेल तसा तो आपल्या सेवकांना व आपल्या इस्राएल लोकांना न्याय देवो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ज्या या शब्दांनी मी याहवेहसमोर प्रार्थना केली आहे त्या याहवेह आमच्या परमेश्वरापुढे रात्रंदिवस असो, यासाठी की रोजच्या गरजेनुसार ते आपल्या सेवकाला व आपल्या इस्राएली लोकांना साहाय्य करो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यामध्ये खंड पडू देऊ नये.