1 Kings 8:64 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्या दिवशी अर्पण केले. त्याने तेथे होम बली, धान्य आणि आधी शात्यार्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणाची चरबी ही तेथेच अर्पण केली, कारण परमेश्वरासमोर असलेल्या पितळेच्या वेदीवर त्यांचा समावेश होईना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच दिवशी राजाने याहवेहच्या मंदिरापुढच्या द्वारमंडपाचा मधला भाग पवित्र केला आणि तिथे त्याने होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणाची मांदे ही अर्पण केली, कारण याहवेहपुढे जी कास्याची वेदी होती ती होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणाची मांदे यासाठी फार लहान होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्यादिवशी अर्पण केले. त्याने तेथे होमबली, धान्य आणि आधी शांत्यर्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले.