1 Kings 9:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शलमोनराजाने मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरुशलेमभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोन राजाने लोक वेठीस धरून परमेश्वराचे मंदिर, आपला राजवाडा, मिल्लो, यरुशलेमेचा तट, हासोर, मगिद्दो व गेजेर ही उभारली त्याचा वृत्तान्त असा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोन राजाने ज्या मजुरांना याहवेहचे मंदिर, आपला स्वतःचा राजवाडा, स्तरीय बांधकाम, यरुशलेमचा तट आणि हासोर, मगिद्दो व गेजेर नगर बांधण्यासाठी कामावर लावले होते त्यांचा अहवाल अशाप्रकारे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोन राजाने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरूशलेम सभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.