1 Kings 9:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मिसरच्या राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानीं लोकांना त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिसर देशाचा राजा फारो ह्याने गेजेरवर चढाई करून ते घेतले आणि आग लावून जाळून टाकले व तेथल्या कनानी रहिवाशांचा संहार केला. त्याने ते नगर आपली कन्या शलमोनाची बायको हिला आंदण म्हणून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(इजिप्तचा राजा फारोहने गेजेरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले होते. त्याने त्याला आग लावली व त्यातील कनानी रहिवाशांना मारून टाकले व ते नगर आपली कन्या, शलोमोनच्या पत्नीला तिच्या लग्नाची भेट म्हणून दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसरच्या फारो राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानी लोकांस त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते.