1 Kings 9:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरुशलेममध्ये, लबानोनमध्ये आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्याला हवे ते ते बांधले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याखेरीज आणखी भांडारासाठी आणि रथ व स्वार ह्यांच्यासाठी नगरे बांधली आणि तसेच यरुशलेमेत, लबानोनावर व आपल्या सर्व राज्यात आपल्या मनास आले तेही सर्व त्याने बांधले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे शलोमोनचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे व नगरे; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व प्रदेशात त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोनाने अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरूशलेमामध्ये, लबानोनात आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्यास हवे ते ते बांधले.