1 Kings 9:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांना मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्राएली लोक सैनिक, सरकारी अधिकाही, कारभारी, सरदार, रथधिपती आणि चालक अशा पदांवर होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने दास करून ठेवले नाही; ते योद्धे, कामदार, सरदार, सेनापती आणि रथ व स्वार ह्यांवरचे अधिपती होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु इस्राएली लोकांपैकी कोणावरही शलोमोनने गुलामी लादली नाही; ते त्याचे योद्धे, त्याचे सरकारी अधिकारी, सरदार, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएल लोकांस मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्राएली लोक सैनिक, सरकारी अधिकारी, कारभारी, सरदार, रथाधिपती आणि चालक अशा पदांवर होते.