1 Peter 1:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मानसिकदृष्ट्या सावध असा आणि पूर्णपणे आत्मसंयमन करा. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा तुम्हाला जे आशीर्वाद देण्यात येतील त्यावर तुमची आशा केंद्रित करा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून तुम्ही तुमचे मन कृतीसाठी खंबीर करा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणार्‍या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा तुम्हाला दिल्या जाणार्‍या कृपेवर सावध अंतःकरणाने आणि संपूर्ण विचारशीलतेने तुमची आशा ठेवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.