1 Peter 2:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रियजनहो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की, तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रियजनहो, जे तुम्ही ह्या जगात परके व निराश्रित आहात, त्या तुम्हांला मी विनंती करतो की, आत्म्याविरुद्ध लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रिय मित्रांनो, जे तुम्ही या जगात परदेशीय व बंदिवासात आहात त्या तुम्हाला मी विनंती करतो की, ज्या पापी वासना तुमच्या आत्म्याविरुद्ध लढतात त्यापासून दूर राहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्‍या दैहिक वासनांपासून दूर रहा.