1 Peter 2:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
घरातील गुलामांनो, संपूर्ण आदराने तुमच्या मालकाच्या अधीन असा, जे चांगले आणि दयाळू आहेत त्यांच्याशीच नव्हे तर जे कठोरतेने वागतात त्यांच्यासुद्धा अधीन असा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण आदरभावाने आपल्या धन्याच्या अधीन असा, जे कोणी चांगले व समंजस आहेत केवळ त्यांच्याच नव्हे, तर जे कठोर आहेत त्यांच्याही अधीन असा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण भयाने आपल्या धन्यांच्या अधीन असा; जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे, तर जे कठोर त्यांच्याही अधीन असा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दासांनो, आदराने परमेश्वराचे भय बाळगून तुम्ही स्वतःला तुमच्या धन्याच्या अधीन करा, फक्त जे चांगले आणि कृपाळू आहेत अशांच्याच नाही, तर जे कठोर आहेत अशा धन्यांच्यासुद्धा अधीन राहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
घरच्या नोकरांनो, तुम्ही पूर्ण आदराने आपल्या स्वामीच्या आज्ञेत रहा. जे चांगले आणि सहनशील असतील त्यांनाच नव्हे, पण कठोर असतील त्यांनादेखील आज्ञेत रहा