1 Peter 3:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याचप्रमाणे, पत्नींनो, आपल्या पतींच्या अधीन असा. यासाठी की, त्यांच्यापैकी काहींनी जर देवाची आज्ञा पाळली नाही तर काही न बोलताही आपल्या सदवर्तनाने त्यांची मने जिंकता येतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्त्रियांनो, तुम्हीही पतीच्या अधीन असा, ह्यासाठी की, त्यांच्यापैकी कोणी देवाचे वचन स्वीकारीत नसतील, तर तुमचे आदरयुक्त शुद्ध वर्तन पाहून ते आपल्या पत्नीच्या वर्तनाने श्रद्धावान होतील; तुम्हांला एक शब्दही उच्चारावा लागणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच, स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा; ह्यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पत्नींनो याचप्रकारे तुम्ही तुमच्या पतीच्या आज्ञेत राहा, म्हणजे त्यांच्यापैकी कोणी जर परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवीत नाहीत, तर ते वचनाशिवाय त्यांच्या पत्नींच्या वर्तणुकीद्वारे जिंकले जाऊ शकतात;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील.