1 Peter 4:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते त्यांच्या वागणुकीचा हिशोब येशू ख्रिस्त जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास तयार आहे, त्यास देतील,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे, त्या न्यायाधीशाला त्यांना हिशेब द्यावा लागणार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण एवढे लक्षात ठेवा की, त्यांना त्यांचा हिशोब त्या परमेश्वराला द्यावा लागेल जे जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास सिद्ध आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीही, देव जो जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे त्यास ते आपला हिशोब देतील.