1 Peter 5:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्हाला देवाच्या खऱ्या कृपेची साक्ष द्यावी व तुम्हाला उत्तेजन द्यावे म्हणून मी हे पत्र सिल्वानच्या हातून थोडक्यात लिहीत आहे कारण सिल्वान हा आपला विश्वासू भाऊ आहे. असे मी समजतो. देवाच्या खऱ्या कृपेत दुढ राहा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवीत आहे. ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहवून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याला मी एकनिष्ठ भाऊ मानतो, त्या सीलासच्या मदतीने मी तुम्हाला थोडक्यात लिहिले आहे, तुम्हाला उत्तेजित करतो आणि अशी साक्ष देतो की, हीच परमेश्वराची खरी कृपा आहे. यामध्येच स्थिर राहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी ज्या सिल्वानला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्याहाती तुम्हास थोडक्यात लिहून पाठवून, बोध करतो आणि साक्ष देतो की, ही देवाची खरी कृपा आहे. त्यामध्ये तुम्ही स्थिर रहा.