1 Samuel 1:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती मनोमन प्रार्थना करत होती त्यामुळे तिचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर फुटत नव्हते. त्यामुळे ती दारुच्या नशेत आहे असे एलीला वाटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हालत होते; पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता; म्हणून एली ह्याला वाटले की, ती द्राक्षारस प्याली असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हन्नाह तिच्या मनात प्रार्थना करीत होती, आणि तिचे ओठ हालत होते, परंतु तिचा आवाज मात्र ऐकू येत नव्हता. एलीला वाटले की ती नशेत आहे
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हन्ना तर आपल्या मनात बोलत होती. तिचे ओठ मात्र हालत होते पण तिची वाणी ऐकू येत नव्हती म्हणून ती मद्य पिऊन नशेत बोलत असेल असे एलीला वाटले.