1 Samuel 1:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वांचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गूपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करायला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्रस्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. तेव्हा एली परमेश्वराच्या मंदिराच्या दाराजवळ असलेल्या आपल्या आसनावर बसला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकदा, शिलोह येथे त्यांनी खाणेपिणे संपविल्यानंतर हन्नाह उठली. तेव्हा एली याजक याहवेहच्या मंदिराच्या दारात त्याच्या खुर्चीवर बसलेला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अशाच एका प्रसंगी, त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली. आता एली याजक परमेश्वराच्या घराच्या दाराजवळच्या आपल्या आसनावर बसला होता.