1 Samuel 10:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याला व त्याच्या नोकराला शौलच्या काकाने इतके दिवस तुम्ही कोठे होतात म्हणून विचारले. शौल म्हणाला, “आम्ही आपली गाढवे शोधायला गेलो होतो. ती मिळाली नाहीत तेव्हा शमुवेलला भेटायला आम्ही गेलो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाचा काका त्याला व त्याच्या गड्याला म्हणाला, “तुम्ही कोठे गेला होता?” ते म्हणाले, “गाढवे शोधायला; ती सापडत नाहीत असे पाहून आम्ही शमुवेलाकडे गेलो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शौलाच्या काकाने त्याला आणि त्याच्या सेवकाला विचारले, “तुम्ही कुठे गेला होता?” तो म्हणाला, “गाढवांना शोधण्यासाठी गेलो होतो, परंतु ती आम्हाला सापडत नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलकडे गेलो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर, शौलाचा काका त्यास व त्याच्या चाकराला म्हणाला, “तुम्ही कोठे गेला होता?” तो बोलला, “आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो; ती नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलाकडे गेलो.”