1 Samuel 10:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौलने सांगितले, “गाढवांचा शोध लागला आहे असे शमुवेल म्हणाला.” शमुवेलच्या इतर वक्तव्याबद्दल, राज्याबद्दल त्याने काकाला काहीही सांगितले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल आपल्या काकाला म्हणाला, “गाढवे सापडली आहेत असे त्याने आम्हांला कळवले.” शमुवेलाने राजपदाविषयी जे काही कळवले होते त्यासंबंधाने त्याने त्याला काहीएक सांगितले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाने उत्तर दिले, “गाढवे सापडली आहेत याची त्यांनी आम्हाला खात्री दिली.” परंतु राजपदाबद्दल शमुवेलने जे सांगितले होते ते त्याने त्याच्या काकांना सांगितले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शौल आपल्या काकाला म्हणाला, “गाढवे सापडली असे त्याने आम्हास उघड सांगितले.” परंतु राज्याविषयीची जी गोष्ट शमुवेल बोलला ती त्याने त्यास सांगितली नाही.