1 Samuel 10:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्व आपत्तीतून तुम्हाला सोडवणाऱ्या परमेश्वराचाच आज तुम्ही त्याग करायला निघालेला आहात. राजा हवा अशी तुमची मागणी आहे. तेव्हा आता आपापल्या वंशांप्रमाणे, घराण्यांसकट परमेश्वरापुढे हजर व्हा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तुम्हांला सर्व विपत्तीतून व संकटातून सोडवणार्या तुमच्या देवाचा आज तुम्ही अव्हेर केला आहे, व तुम्ही त्याला म्हणाला आहात की हे ठीक नव्हे, आमच्यावर राजा नेमावा; तर आता वंशावंशांनी आणि हजाराहजारांनी परमेश्वरासमोर येऊन हजर व्हा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तुम्ही आता तुमच्या परमेश्वराला नाकारले आहे, जे तुम्हाला तुमच्या सर्व अरिष्टांपासून आणि संकटांपासून वाचवितात. आणि तुम्ही म्हणाला, ‘नको, आता आमच्यावर एक राजा नेम.’ तर आता तुमच्या गोत्रानुसार व कुळांनुसार याहवेहसमोर हजर व्हा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु तुमचा परमेश्वर, जो स्वत: तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हास सोडवतो त्यास तुम्ही आज नाकारले; आणि आम्हांवर राजा नेमून ठेव, असे त्यास म्हटले. तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्वराच्या समोर उभे राहा.”