1 Samuel 10:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शमुवेल पुढे म्हणाला, “पुढे गेलास की तुला ताबोरचा एला ओक वृक्ष लागेल. तिथे तुला देवाच्या भक्तीसाठी बेथलकडे निघालेली तीन माणसे भेटतील. त्यातल्या एकाजवळ तीन तान्ही करडं दुसऱ्याजवळ तीन भाकरी आणि तिसऱ्याकडे द्राक्षरसाचा बुधला असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एला वृक्ष तुला लागेल, तेथे तीन माणसे बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील, त्यांतल्या एकाच्या हातात तीन करडे, दुसर्‍याच्या हातात तीन भाकरी आणि तिसर्‍याच्या हातात एक द्राक्षारसाचा बुधला असेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नंतर तिथून पुढे जात तू ताबोराच्या मोठ्या एलावृक्षाजवळ पोहोचशील. तिथे तुला बेथेलकडे परमेश्वराची आराधना करण्यासाठी निघालेली तीन माणसे भेटतील. एकजण तीन लहान करडे, दुसरा तीन भाकरी आणि तिसरा द्राक्षारसाची एक बुधली घेऊन जात असेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तेथून तू पुढे जाऊन, ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील. तेव्हा तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षरसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील.