1 Samuel 11:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
साधारण महिन्याभरानंतर अम्मोनी राजा नाहाश याने आपल्या सैन्यासह याबोश गिलादला वेढा दिला. तेव्हा याबेशाच्या लोकांनी नाहाशला निरोप पाठवला की तू आमच्याशी करार केल्यास तुझ्या आधिपत्याखाली आम्ही राहू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर अम्मोनी नाहाश ह्याने स्वारी करून याबेश-गिलादासमोर तळ दिला; तेव्हा याबेशचे सर्व लोक नाहाश ह्याला म्हणाले की, “आमच्याशी करारमदार कर म्हणजे आम्ही तुझे अंकित होऊ.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अम्मोनी नाहाश याने जाऊन याबेश-गिलआदला वेढा घातला. याबेशचे सर्व पुरुष त्याला म्हणाले, “आमच्यासह एक करार कर, म्हणजे आम्ही प्रजा होऊन तुमची सेवा करू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.”