1 Samuel 11:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एवढे झाल्यावर लोक शमुवेलला म्हणाले, “शौलला विरोध करणारे, त्याचे राज्य नको असलेले कुठे आहेत ते लोक? त्यांना आमच्या समोर आणा. त्यांनाही मारुन टाकतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग लोकांनी शमुवेलास विचारले, “हा शौल आमच्यावर राज्य करणार काय, असे जे म्हणाले ते कोणते लोक? त्यांना बाहेर काढा म्हणजे आम्ही त्यांना मारून टाकू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा लोक शमुवेलास म्हणाले, “ते कोण होते ज्यांनी विचारले होते, ‘शौल आमच्यावर राज्य करेल काय?’ त्या माणसांना आमच्याकडे आणा, म्हणजे आम्ही त्यांना जिवे मारू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग लोक शमुवेलाला म्हणाले, “शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.”