1 Samuel 11:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौल तेव्हा आपली गुरे चरायला घेऊन गेला होता. कुरणातून येतांना त्याने लोकांचा आक्रोश ऐकला. तेव्हा त्याने विचारले, “हे काय चालले आहे? लोकांना शोक करायला काय झाले?” तेव्हा लोकांनी त्याला दूताचे म्हणणे सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शौल गुरांच्या मागून शेतातून येत होता; त्याने विचारले, “लोक का रडतात? त्यांना काय झाले?” याबेशच्या लोकांचे म्हणणे त्यांनी त्याला कळवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचवेळेस शौल त्याच्या बैलांमागून शेतातून परत येत होता, त्याने विचारले, “प्रत्येकाला काय झाले आहे? ते का रडत आहेत?” तेव्हा याबेशाच्या लोकांनी जे काही सांगितले होते ते त्यांनी त्याला सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्या मागून चालत येत होता. शौल म्हणाला, “लोकांस काय झाले? म्हणून ते रडत आहेत?” तेव्हा त्यांनी त्यास याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले.