1 Samuel 11:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने एक बैलांची जोडी घेऊन तिचे तुकडे तुकडे केले आणि दूतांना ते इस्राएलच्या सर्व प्रांतात फिरवायला सांगितले. त्याचबरोबर ही दवंडी पिटायला सांगितली. “सर्वजण शौल आणि शमुवेल यांच्या पाठीशी राहा. यात हयगय झाल्यास त्याच्या गुरांचीही अशीच गत होईल.” परमेश्वराच्या धास्तीने लोक एकदिलाने एकत्र आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने एक बैलाची जोडी कापून त्यांचे तुकडे केले व ते जासुदांच्या हाती इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवले आणि त्यांना निरोप दिला की, “जो कोणी शौल व शमुवेल ह्यांच्यामागे येणार नाही त्यांच्या बैलांची अशीच गत होईल.” तेव्हा परमेश्वराची दहशत लोकांवर बसून ते एकचित्ताने बाहेर निघाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने बैलाची एक जोडी कापून त्यांचे तुकडे केले आणि निरोप्यांच्या हाती ते तुकडे सर्व इस्राएलमध्ये पाठविले आणि जाहीर केले, “जे कोणी शौल आणि शमुवेल यांचे अनुसरण करणार नाही, त्यांच्या बैलांचे असेच केले जाईल.” तेव्हा लोकांना याहवेहचे भय वाटू लागले आणि ते एकजूट होऊन बाहेर आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, “जो कोणी शौलामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल.” तेव्हा परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले.