1 Samuel 12:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर तुमचे सतत रक्षण करील पण तुम्ही मात्र त्यासाठी खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत; सन्मानपूर्वक परमेश्वराची सेवा करा. त्याच्या आज्ञेविरुध्द जाऊन कोणाशी लढू नका. तुम्ही व तुमचा राजा यांनी परमेश्वर देवालाच मानावे. असे वागल्याने परमेश्वर तुमचे रक्षण करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची भक्ती करीत राहाल, त्याची वाणी ऐकत राहाल, त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करणारा हा राजा व तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याचे अनुसरण कराल तर बरे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुम्ही याहवेहचे भय धरून त्यांची सेवा कराल, त्यांचे आज्ञापालन कराल आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करतो तो तुमचा राजा व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे अनुसरण कराल, तर बरे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची सेवा कराल, त्याची वाणी ऐकाल, आणि परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध बंड करणार नाही, तर तुम्ही व तुम्हावर राज्य करणारा तुमचा राजाही परमेश्वर तुमचा देव याला मानीत जाल तर बरे.