1 Samuel 12:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते शमुवेलला म्हणाले, “आम्हा दासांच्या वतीने तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. आम्हाला मरु देऊ नका. आमच्या हातून अनेक पातके घडली आहेत. राजाची मागणी करुन तर आम्ही त्यात आणखी भरच घातली आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा सर्व लोक शमुवेलास म्हणाले, “आपल्या दासांप्रीत्यर्थ आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही; आम्ही राजा मागितला त्यामुळे आमच्या एकंदर पातकांना हे एक दुष्कर्म आम्ही जोडले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व लोक शमुवेलला म्हणाले, “याहवेह तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही, कारण राजाची मागणी करून आम्ही आमच्या इतर सर्व पापांमध्ये भर घातली आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा अवघे लोक शमुवेलाला म्हणाले, “आम्ही मरू नये म्हणून, परमेश्वर तुमचा देव याच्याकडे तुम्ही आपल्या सेवकांसाठी प्रार्थना करा. कारण आम्ही राजा मागून आपल्या सर्व पापांत आणखी या दुष्कर्माची भर टाकली आहे.”