1 Samuel 12:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याकोब मिसरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्याच्या वंशजांचे जिणे कठीण केले तेव्हा त्यांनी परमेश्वराची करुणा भाकली. म्हणून परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना पाठवले. त्यानी मग त्या तुमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले आणि या ठिकाणी आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोब मिसरात गेला आणि तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना पाठवले व त्यांनी तुमच्या वाडवडिलांना मिसरातून काढून आणून ह्या स्थळी वसवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकोबाने इजिप्तमध्ये प्रवेश केल्यानंतर साहाय्यासाठी ते याहवेहकडे रडले आणि याहवेहने मोशे आणि अहरोन यांना पाठविले, त्यांनी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणले आणि त्यांना या ठिकाणी वसविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोब मिसरात गेल्यावर, तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराकडे आरोळी केली. तेव्हा परमेश्वराने मोशेला व अहरोनाला पाठवले, त्यांनी तुमच्या वाडवडिलांना मिसरातून काढून आणले आणि या ठिकाणी वसवले.