1 Samuel 13:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशाप्रकारे युद्धाच्या दिवशी शौलच्या सैन्यातील एकाच्याही जवळ तलवार किंवा भाला नव्हता. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ तेवढी लोखंडी हत्यारे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे युद्धाच्या दिवशी असे झाले की शौल व योनाथान ह्यांच्याबरोबर असलेल्या कोणाही मनुष्याच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्याजवळ मात्र ही हत्यारे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून लढाईच्या दिवशी शौल आणि योनाथान यांच्याबरोबर असलेल्या कोणाही सैनिकांच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; केवळ शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याकडेच हत्यारे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि लढाईच्या दिवशी असे झाले की, जे लोक शौल व योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यातल्या कोणाच्याही हाती तलवार व भाला नव्हता. फक्त शौल व त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ ते होते.