1 Samuel 13:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गिबा येथील छावणीतील पलिष्ट्यांच्या योनाथानने पराभव केला. ते पलिष्ट्यांच्या सेनापतीच्या कानावर गेले. ते म्हणाले, “इब्री लोकांनी बंड केले आहे.” शौल म्हणाला, “नेमके काय घडले ते इब्रींना ऐकू द्या” आणि त्याने आपल्या लोकांना इस्राएलभर रणशिंग फुंकून ही बातमी सांगायला सांगितली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिबा येथे पलिष्ट्यांचे ठाणे होते त्यावर योनाथानाने मारा केला; हे वर्तमान पलिष्ट्यांच्या कानी गेले. मग शौलाने देशभर रणशिंग वाजवून लोकांना सांगितले की, “इब्री लोकहो, कान द्या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेबा येथील पलिष्ट्यांच्या ठाण्यावर योनाथानने हल्ला केला आणि पलिष्ट्यांनी याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने संपूर्ण प्रदेशामधून रणशिंग वाजवित म्हटले, “इब्री लोकांनो, ऐका!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गिब्यात पलिष्ट्यांच्या सैन्यांना योनाथानाने पराजित केले आणि पलिष्ट्यांनी त्याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने सर्व मुलखात शिंग वाजवून म्हटले, “इब्र्यांना ऐकू द्या.”