1 Samuel 13:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व इस्राएसांच्या हे कानावर आले. त्यांना वाटले, “शौलने पलिष्ट्यांच्या नेत्याला मारले. तेव्हा पलिष्ट्यांना आता इस्राएलांबद्दल द्वेष वाटतो.” सर्व इस्राएलांना गिलगाल येथे शौलजवळ एकत्र जमायचा निरोप गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर मारा केला आणि पलिष्टी लोकांना इस्राएलाचा वीट आला, हे सर्व इस्राएलाच्या कानी गेले. हे ऐकून लोक शौलाजवळ गिलगालात जमा झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा इस्राएली लोकांनी ही बातमी ऐकली: “शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर हल्ला केला आहे आणि पलिष्ट्यांसमोर इस्राएली लोक घृणित ठरले.” म्हणून लोकांना गिलगाल येथे शौलाबरोबर येण्यासाठी बोलाविण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाने पलिष्ट्यांच्या सैन्याला पराजित केले आणि पलिष्ट्यांना इस्राएलाचा तिरस्कार वाटू लागला, असे सर्व इस्राएलांनी ऐकले. त्यानंतर लोक शौलाजवळ गिलगालात एकत्र जमले.