1 Samuel 13:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलांशी सामना करायला पलिष्टे ही सिध्द झाले. पलिष्ट्यांचा सेनासागर किनाऱ्यावर जेवढे वाळूचे कण असतील तेवढे सैनिक त्यांच्याकडे होते. सेनासागर विशाल होता. त्यांच्याकडे तीन हजार रथ आणि सहा हजारांचे घोडदळ होते. त्यांनी बेथ-ओवनच्या पूर्वेला मिखमाश येथे तळ दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पलिष्टी लोक इस्राएल लोकांशी लढण्यास जमा झाले; तीस हजार रथ, सहा हजार स्वार आणि समुद्रकिनार्‍यावरील वाळूइतके विपुल लोक एकत्र झाले; त्यांनी बेथ-आवेनाच्या पूर्वेला जाऊन मिखमाश येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तीन हजार रथ, सहा हजार रथस्वार आणि समुद्र किनार्‍यावरील वाळूइतके असंख्य सैनिक बरोबर घेऊन पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करण्यास एकत्र आले. त्यांनी मिकमाश येथे बेथ-आवेनच्या पूर्वेकडे आपला तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तीस हजार रथ व सहा हजार रथ चालवणारे, आणि समुद्राच्या वाळूसारखे असंख्य लोक घेऊन पलिष्टी इस्राएलाशी लढाई करायला जमले आणि त्यांनी मिखमाशात येऊन बेथ-आवेनाच्या पूर्वेस तळ दिला.