1 Samuel 14:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या छावणीतील पलिष्ट्यांनी या दोघांना “वर या म्हणजे चांगला धडा शिकवतो” असे धमकावले. योनाथान आपल्या सेवकाला म्हणाला, “चल माझ्या मागोमाग. परमेश्वर आता आपल्या हातून पलिष्ट्यांना नेस्तनाबूत करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या ठाण्यातले लोक योनाथानाला व त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाले, “तुम्ही आमच्याकडे या, म्हणजे आम्ही तुम्हांला काही दाखवू.” योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागून वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चौकीवरील लोक योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाला ओरडून म्हणाले, “इकडे आमच्याकडे वर या, म्हणजे आम्ही तुम्हाला धडा शिकवू.” तेव्हा योनाथान शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, माझ्यामागे वर ये; कारण याहवेहने त्यांना इस्राएलच्या हाती दिले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ठाण्याच्या मनुष्यांनी योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांना उत्तर देऊन म्हटले, “वर आम्हाकडे या म्हणजे आम्ही तुम्हास काही गोष्टी दाखवू.” तेव्हा योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागे वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.”