1 Samuel 14:13 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योनाथान व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक हे मेटाकुटीने वर चढले. योनाथानापुढे पलिष्टी लोक चीत झाले व त्याच्या शस्त्रवाहकाने त्याच्या मागून जाऊन त्यांचा संहार केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योनाथान आपल्या हातापायांचा वापर करीत वर चढला, त्याच्यामागे त्याचा शस्त्रवाहक चढत गेला. पलिष्टी लोक योनाथानसमोर पडले व त्याचा शस्त्रवाहक त्याच्यामागे पलिष्ट्यांना मारत त्यांच्यामागे गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्या मागोमाग चढून गेला. तेव्हा योनाथानासमोर पलिष्टी पडले व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक त्यांना मारीत गेला.