1 Samuel 14:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा छावणीत, शेतात, किल्ल्यावर पसरलेल्या सर्व पलिष्ट्यांमध्ये घबराट पसरली. चांगल्या शूर सैनिकांनीही धास्ती घेतली. त्यांच्या पायाखालची भूमी कंपायमान झाली आणि पलिष्टी भयभीत झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग छावणीतील व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरकाप झाला; ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हेही थरथरा कापू लागले; भूमीही कंपायमान झाली; ह्या प्रकारे प्रचंड कंप झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
छावणीत व शेतात, चौकीवर व छापा टाकणारे अशा संपूर्ण सैन्यामध्ये भय निर्माण झाले; आणि भूमी हादरली, ते परमेश्वराकडून पाठविलेले भयंकर भय होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
छावणीत शेतात व सर्व लोकांमध्ये कंप झाला, ते ठाणे व छापे मारणारेही कापले व भूमी कापली. तेथे तर फार घबराट पसरली होती.