1 Samuel 14:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौल आपल्या रक्षकांना म्हणाला, “आपली माणसे मोजा. कोण छावणी सोडून गेले ते पाहू.” मोजणीतून योनाथान आणि त्याचा सेवक गेल्याचे लक्षात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शौलाने आपल्याबरोबरच्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची मोजणी करून त्यांच्यामधून कोण गेले ते पाहा.” त्यांनी मोजणी केली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक हे नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शौलाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची हजेरी घ्या आणि आम्हाला कोण सोडून गेला आहे ते पाहा.” त्यांनी हजेरी घेतली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तिथे नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौल आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “आमच्यामधून कोण गेला आहे? मोजून पाहा.” मग त्यांनी मोजून पाहिले तर योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते.