1 Samuel 14:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौलने सैन्य जमा केले आणि तो युद्धाला भिडला. पलिष्ट्यांची आता दाणादाण उडाली. इतकी की ते आपापसातच लढू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शौल व त्याच्याबरोबरचे सर्व लोक एकत्र जमून लढाईला गेले; तेव्हा प्रत्येकाची तलवार त्याच्या-त्याच्या सोबत्यावर चालून ते पराकाष्ठेचे घाबरून गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शौल व त्याचे लोक एकत्र जमा होऊन युद्धास निघाले. त्यांना पलिष्टी लोक मोठ्या गोंधळात, त्यांच्याच तलवारीने एकमेकास मारत असलेले दिसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शौल व त्याच्याजवळ ते सर्व लोक जमून लढाईला गेले. आणि पाहा प्रत्येक पलिष्टी मनुष्याची तलवार आपल्या सोबत्याच्या विरूद्ध झाली म्हणून फार मोठी दाणादाण उडाली.