1 Samuel 14:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात दडून राहिलेल्या इस्राएलांनी पलिष्ट्यांच्या पलायनाची बातमी ऐकली. तेव्हा तेही युद्धात उतरले आणि त्यांनी पलिष्ट्यांचा पाठलाग सुरु केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच जे इस्राएल लोक एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की, पलिष्टी लोक पळत आहेत तेव्हा त्यांनीही त्यांच्याशी लढून त्यांचा जबर पिच्छा पुरवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात जे इस्राएली लोक लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की पलिष्ट्यांनी पळ काढला आहे त्यांनीही त्याच ईर्षेने युद्धात भाग घेतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जी इस्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व पलिष्टी पळत आहेत हे ऐकून लढाईत त्याच्या पाठीस लागली.