1 Samuel 14:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यातील एकाचे नाव अहीया. शिलो येथे एली म्हणून परमेश्वराचा याजक होता. त्याच्या जागी आता हा होता. अहीयाने एफोद घातला होता. ईखाबोदचा भाऊ अहीदूब याचा हा मुलगा. ईखाबोद फिनहासचा आणि फिनहास एलीचा मुलगा. योनाथान निघून गेला हे लोकांना माहीत नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहीया बिन अहीटूब (ईखाबोदाचा भाऊ) बिन फिनहास बिन एली शिलोत परमेश्वराचा याजक होता; तो एफोद धारण करून त्याच्याबरोबर होता. योनाथान गेला हे लोकांना माहीत नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यापैकी एक एफोद घातलेला अहीयाह होता. तो शिलोहमध्ये जो याहवेहचा याजक होता त्या एलीचा पुत्र फिनहास, याचा पुत्र ईखाबोद, याचा भाऊ अहीतूब याचा पुत्र होता. योनाथान गेला आहे, हे कोणालाही माहीत नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलीचा मुलगा फिनहास याचा मुलगा ईखाबोद याचा भाऊ अहीटूब याचा मुलगा अहीया शिलोत एफोद घातलेला परमेश्वराचा याजक हाही होता. तेव्हा योनाथान गेला हे लोकांस माहित नव्हते.